पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी
ENGLISH मराठी
  • जर बिल दिल्यापासुन विहीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे प्रकरण ८ कराधान नियम ४१ अन्वये प्रतीमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल. || मालमत्ता कर भरणा करण्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास अथवा अधिक माहीती करिता सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत (-) या टोल फ्री नंबर क्रमांकावर संपर्क साधावा.(शासकिय सुट्ट्या वगळता) तसेच panvelcorp.helpdesk@gmail.com या इमेल आय.डी. वर मेल करा
  • SCHEMES & DISCOUNT
    • 1) स्वातंत्र्य सैनिक किंव्हा त्यांची पत्नी यांचे फक्त एका निवासी मालमत्तेस सामान्य करावर(कालावधी माहे एप्रिल ते जून अखेर ) 50% सूट मिळणार
    • 2) फक्त महिलांचे नाव असलेल्या आणि फक्त एका निवासी मालमत्तेस सामान्य करावर (कालावधी माहे एप्रिल ते जून अखेर ) 30 % सूट मिळणार
    • 3) 40% किंव्हा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या डिव्यांग व्यक्तींचे (अंध , दीव्यांग,मतिमंद,कर्णबधिर व मूकबधिर इ.) फक्त एका मालमत्तेस सामान्य करावर- (निरंतर) 50% सूट मिळणार
    • 4) थकबाकीसह दोन्ही सहामाहीची संपूर्ण रक्कम एक रकमी आगाऊ भरणाऱ्या करिता सामान्य करावर (कालावधी माहे एप्रिल ते जून अखेर ) 5% सूट मिळणार
    • वरील ०१ ते ०४ योजनेपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ मालमत्ताधारकास घेता येईल या सवलतीचा लाभ घेणेकामी थकबाकीसह दोन्ही सहामाहीची संपूर्ण बिलाची रक्कम एक रकमी आगाऊ भरणेची मुदत (बिल मिळो अथवा ना मिळो)-३० जून अखेर

    • 5) पर्यावरण पूरक इमारत निवासी मालमत्ता-

      1) ऑन साईट कंपोस्टींग-5% 2) एस टी पी - 3% 3) ऑनसाईट कंपोस्टींग + एस टी पी - 8%
      4) झिरो वेस्ट - 8% ५) झिरो वेस्ट + एस टी पी - 10

    • 6) खाजगी शैक्षणिक संस्था-

      1) ऑन साईट कंपोस्टींग-4% 2) झिरो वेस्ट - 7% 3) ऑनसाईट कंपोस्टींग + एस टी पी - 8%
      4) झिरो वेस्ट+सौर उर्जा 9% 5) झिरो वेस्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग + सौर उर्जा - 10%

    • 7) माझी मिळकत माझी आकारणी योजना : स्वयंस्फुर्तीने मनपा संकेतस्थळावरुन मालमत्ता नोंद करणाऱ्या मालमत्ताधारकास - 5% सवलत

    • 8) चालू आर्थिक वर्षात नवीन आकारणी होणाऱ्या मालमत्तेस निवासी / बिगरनिवासी मिश्र/औद्योगिक / मोकळ्या जमिनी इ. मालमत्तेस - 5% सवलत
    • (बिल जनरेट झाल्यापासून 3 महिने किंवा 31 मार्च यापैकी जे अगोदर घडेल त्या तारखेपर्यंत)

    • 9) सलग ३ वर्ष नियमित दरवर्षी मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालधारकास 2% (दोन) जादा प्रोत्साहनपर सवलत (३ वर्षाचे ब्लॉक नंतर चौथ्या वर्षी)

    • 10) थकबाकीसह एक रक्कमी मिळकत कराचा भरणा ऑनलाईन पेमेंट गेट-वेद्वारे करणाऱ्या मालमत्तोधारकास चालू आर्थिक वर्षात : - माहे एप्रिल ते जून अखेर 5% तसेच माहे जुलै ते सप्टेंबर अखेर 4%

    • 11) संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी तसेच अविवाहीत शहीद सैनिक यांचे मालमत्तेस मालमत्ता करात - 100% सुट (सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणी पुरवठा लाभ कर, रस्ता करात)

    • 12) इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन मालमत्ता- मालमत्ता करात 2% सुट

    • 13) ऑनलाइन पेमेंट गेट-वे , RTGS,NEFT व IMPS द्वारे भरणा करणारे मालमत्ताधारक सामान्य करावर (कालावधी माहे एप्रिल ते जून अखेर ) 5% सूट मिळणार